Venue: Zoom Meeting

Date: Sunday, Jan 17, 2020

Time: 4:00 pm

Event Cost: Free

Contact us: committee@mmpgh.org

Event Details: आनंद-मेळा ( Fun fair)

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.
 
आली संक्रांत आली.  गुळाच्या पोळ्या, तिळगूळ सगळ्याची तयारी झाली. आता आपल्या मंडळाच्या १७ जानेवारीच्या कार्यक्रमाची वाट पाहताय ना? आपल्याला  प्रत्यक्ष जरी भेटता येणार नसले तरीही तिळगुळाचा गोडवा आपण virtually नक्कीच वाटू शकू. चला तर मग zoom वर  एकत्र येऊ या आणि संक्रांत साजरी करूया.  ह्या वर्षी आपण दोन वेगवेगळे खेळ खेळणार आहोत.  १७ जानेवारीला दुपारी ४ वाजता.
 
फंताक्षरी (Funtakshari) :  हा एक मजेशीर स्पर्धात्मक कार्यक्रम आहे व त्यादिवशी ग्रुप्समध्ये खेळला जाणार आहे. तुम्हाला हिंदी गाणी आवडतात का?  त्यांचे संगीत, शब्द ओळखता येतात का?  तर फंताक्षरीत भाग घेण्यासाठी लगेच तुमचे नाव नोंदवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण नक्की सांगा. आपण हा खेळ teams करून खेळणार आहोत. तुम्ही तुमची नावे ग्रुप म्हणूनही नोंदवू शकाल. लवकरात लवकर entertainment_committee@mmpgh.org ह्या संकेतस्थळावर आपली नावे पाठवा म्हणजे आम्हाला teams करायला सोपे होईल.   आम्हाला खात्री आहे कि खूप धमाल खेळ होणार आहे.
 
बिंगो (Bingo) : हा तर आपल्याला सर्वांना माहीत असलेलाच खेळ आहे पण तो सुद्धा आपण virtually खेळणार आहोत.  ह्यामध्ये सर्वांना भाग घेता येईल.  त्यासाठीची प्रत्येकी दोन bingo tickets सगळ्या सभासदांना कार्यक्रमापूर्वीच ई-मेलने पाठवली जातील.  तुम्ही ती प्रिंट करून/संगणकावर/कागदावर लिहून काढून खेळू शकाल. 
 
भेटूया तर मग १७ जानेवारीला ४:०० वाजता zoom मिटींगमधे.  
 

 
Considering the current pandemic situation, our Sankrant program is going to be virtual too. We have organized it as a game night.  We will play two different games.  On 17th January at 4:00 pm.
 
Funtakshari:  This is going to be a game played in teams.  Do you like Hindi movie songs?  Can you recognize their music, lyrics, etc?  If you are, then this is a perfect opportunity to test your knowledge.  If you are interested in participating, please send your entries to entertainment_committee@mmpgh.org.  You can also enter as a group.  Sending in your entries as soon as possible will help us create the teams.  
We are sure you all will enjoy this Funtakshari tremendously.
 
Bingo:  This is another all-time favorite game that needs no introduction.  We will play Bingo virtually wherein all of us can participate. You will receive two bingo tickets by email to each household.  You will receive the tickets before 17th January.  Be ready with a print/hand-written copy/electronic copy of the ticket to play.  
 
Let us get ready to have fun!!!